ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
असे म्हटले जाते की, स्वप्न म्हणजे एक दुसरे जगच असते.
अॅस्ट्रोलॉजीनूसार आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नामागे एक गुप्त संकेत असतो.
पण विज्ञानानूसार स्वप्न ही केवळ एक ह्युमन सायकोसॉजीचा भाग आहे.
बऱ्याचदा आपण स्वप्नामध्ये किंचाळत असतो असे दिसते. पण तोंडातून आवाजच निघत नाही.
साधारणताः आपल्याला गाढ झोपेत स्वप्न पडतात.
यावेळी शरिरातील बहुतांश मांसपेशी पॅरालाईज्ड होतात. शरिराची हालचाल करता येत नाही.
पण केवळ आपला मेंदू कार्यरत असतो व स्वप्न पाहत असतो.
गाढ झोपेमुळे आवाज निर्माण करणाऱ्या मांसपेशी निष्क्रिय असतात.
म्हणूनच स्वप्नात ओरडण्याचा किंवा किंचाळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तोंडातून आवाज बाहेर पडत नाही.