Phone Repair Tips: फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी ‘ही’ कामं नक्की करा! अन्यथा होईल मोठा धोका

Dhanshri Shintre

स्मार्टफोन

स्मार्टफोन आता फक्त संवादाचं साधन नसून, वैयक्तिक माहिती, फोटो, बँक डिटेल्स आणि कागदपत्रांचा संग्रह झाला आहे.

स्मार्टफोनमध्ये बिघाड

कधी तरी स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड होतो आणि मग तो दुरुस्तीसाठी जवळच्या रिपेअर सेंटरमध्ये द्यावा लागतो.

प्रायव्हसीचा धोका असतो

मोबाइल दुरुस्तीसाठी बाहेर देताना प्रायव्हसीचा धोका असतो, पण अनेकांना याची जाणीव नसते. अनेकजण फोनमध्ये अत्यंत खाजगी माहिती साठवून ठेवतात अशावेळी या गोष्टी करा.

मोबाईलचा बॅकअप घ्या

सर्वात आधी आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे मोबाईलचा बॅकअप घेणं. Google Drive, iCloud किंवा अन्य क्लाउड सेवा वापरून डेटा सुरक्षित ठेवा.

सिक्योरिटी सेटिंग्ज बंद करा

Gmail, WhatsApp, Facebook, Instagram, Google Pay, Paytm यांसारख्या अ‍ॅप्समधून लॉगआउट करा आणि फिंगरप्रिंट, फेस आयडीसारखी सिक्योरिटी सेटिंग्ज बंद करा.

गेस्ट मोड

अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गेस्ट मोड हा सुरक्षिततेचा चांगला पर्याय आहे. Settings > System > Multiple Users > Add Guest यामार्गे तो सुरू करता येतो.

सिमकार्ड काढून ठेवा

SIM आणि SD कार्डमध्ये अनेक महत्त्वाची माहिती साठवलेली असते, त्यामुळे फोन रिपेअरला देण्याआधी ती कार्ड्स काढून सुरक्षित ठेवा.

फोन एन्क्रिप्ट

डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे फोन एन्क्रिप्ट करणं. यासाठी Settings > Security > Encrypt phone या पर्यायाचा वापर करा.

फॅक्टरी रीसेट करा

स्क्रीन किंवा बॅटरी बदलण्यासाठी फोन दुरुस्त करताना शेवटी फॅक्टरी रीसेट करा, पण आधी नक्कीच पूर्ण बॅकअप घेणे आवश्यक आहे.

NEXT: पावसात फोन भिजला? घाबरू नका, 'या' टिप्सने तुम्ही फोन पुन्हा चालू करू शकता

येथे क्लिक करा