Prostate Cancer: पुरुषांनो सावधान! प्रोस्टेट कॅन्सरची 'ही' ५ सुरुवातीची लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वारंवार लघवी लागणे

विशेषतः रात्री अनेकदा लघवीसाठी उठावे लागत असेल किंवा अचानक लघवीची वारंवारता वाढली असेल, तर ते प्रोस्टेटशी संबंधित समस्येचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

Prostate Cancer

लघवी करताना अडचण जाणवणे

लघवी सुरू होण्यास वेळ लागणे, लघवीची धार कमकुवत असणे, जोर लावावा लागणे किंवा मूत्राशय पूर्णपणे रिकामा झाल्याचे न वाटणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.

warning signs of prostate cancer

लघवी किंवा वीर्यामध्ये रक्त दिसणे

लघवी किंवा वीर्यामध्ये रक्त दिसल्यास ते सामान्य समजण्याची चूक करू नका. हे प्रोस्टेट कॅन्सरसह इतर गंभीर आजारांचेही संकेत असू शकतात. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

prostate cancer

कंबर, नितंब किंवा पेल्विकमध्ये सतत वेदना

कंबर, नितंब किंवा पेल्विक भागात सतत वेदना होत असतील आणि त्यासोबत लघवीसंबंधी त्रास जाणवत असेल, तर वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.

prostate cancer

कारण नसताना वजन कमी होणे आणि सतत थकवा

कोणतेही विशेष कारण नसताना वजन झपाट्याने कमी होणे किंवा कायम थकवा जाणवत असेल, तर तेही गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

prostate cancer

कोणाला अधिक धोका असतो?

५० वर्षांवरील पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक असतो. तसेच घरातील कोणाला हा आजार असले तर धोका आणखी वाढतो. अशा व्यक्तींनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

prostate cancer

लक्षणे नसली तरी तपासणी महत्त्वाची

प्रोस्टेट कॅन्सर अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाही. त्यामुळे केवळ लक्षणांची वाट न पाहता, विशेषतः ५० वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रोस्टेट स्क्रीनिंग करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

warning signs of prostate cancer

Health Care Tip: पावसाळ्यात आजारांपासून राहायचंय दूर? घरच्या घरी करा हे सोपे ७ उपाय

Health Care Tip | Saam Tv
येथे क्लिक करा