Property Rights: दोन बायका असणाऱ्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीचे विभाजन कसे होते?

Bharat Jadhav

संपत्तीबाबत अनेक प्रश्न

या प्रकरणांमध्ये मालमत्तेचे विभाजन कसे केले जाते? कायदा काय म्हणतो? मृत्युपत्रात फक्त एकाच पत्नीचे नाव असल्यास काय होते? दोघांचेही नाव असल्यास ते कसे ठरवले जाईल?

दोन लग्नांची कायदेशीर स्थिती काय?

सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणतात की, १९५५ च्या हिंदू विवाह कायद्यानुसार,पहिला विवाह कायदेशीररित्या घटस्फोट झाल्याशिवाय हिंदू पुरुष दुसरे लग्न करू शकत नाहीत. किंवा पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला असेल तर.

कायद्यानुसार गुन्हा

जर एखाद्या व्यक्तीने त्याची पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केले तर ते द्विविवाह (बहुपत्नीत्व) ठरते, जो भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे.

धर्म बदलावा लागेल

जर एखाद्या हिंदू पुरूषाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि पुन्हा लग्न केले तर त्याला शरिया कायद्यानुसार एकापेक्षा जास्त विवाह करण्याची परवानगी मिळते.

मालमत्तेची विभागणी कशी होते?

अ‍ॅडव्होकेट म्हणतात की, मृत्युपत्र हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे जे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचा वारसा कोणाला मिळेल हे सागंत असते.

मृत्यूपत्र महत्त्वाचे

जर त्या व्यक्तीने फक्त एकाच पत्नीच्या किंवा तिच्या मुलांच्या नावाने मृत्युपत्र केले असेल, तर भारतीय उत्तराधिकार कायदा त्या मृत्युपत्राचा आदर करतो.

अधिकार नसेन

जर दुसऱ्या पत्नीचा विवाह अवैध मानला गेला, तर मृत्युपत्रात तिचे नाव नसल्यास तिला मालमत्तेवर कायदेशीर अधिकार राहत नाहीत.

तर दुसऱ्या पत्नीला मिळते संपत्ती

परंतु जर त्या व्यक्तीचं दुसर लग्न सार्वजनिक असेन. त्या लग्नातून त्याला मुले असतील तर मुले बेकायदेशीर नाहीत परंतु त्यांना मालमत्तेत वाटा मिळू शकतो. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणात हे निरीक्षण नोंदवलंय.

जर दोन्ही पत्नींची नावे मृत्यूपत्रात असतील तर

जर त्या व्यक्तीने आपल्या दोन्ही बायकांचे आणि त्यांच्या मुलांचे दोन्ही हिस्से मृत्युपत्रात लिहून निश्चित केले असतील, तर मालमत्तेची विभागणी मृत्यूपत्रानुसार होते.

मृत्यूपत्र बनवलं नसेल तर

हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ अंतर्गत पहिल्या पत्नीसोबतचा विवाह वैध असेल आणि दुसरा विवाह अवैध मानला जातो.

मुलांना मिळतो वाटा

विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेचे सह-मालक मानले जाते, जरी आईला तिच्या पतीचा वाटा मिळत नसला तरी.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Black Raisins: लोखंडाप्रमाणे मजबूत हाडं हवीत? मग 'या' पदार्थाचं करा सेवन