Bharat Jadhav
बळकट शरीर हवे असेल तर निरोगी हाडे आवश्यक असतात. कधीकधी वृद्धत्व, खराब आहार आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात.
जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत हवी असतील आणि म्हातारपणात तुम्हाला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागू नये असे वाटत असेन, तर तुमच्या आहारात काळ्या मनुकाचा समावेश करा.
हाडे आपल्या शरीराला योग्य रचना प्रदान करतात. आपल्याला योग्य आकार देतात. आपले शरीर सरळ ठेवतात आणि आपल्याला हालचाल करण्यास मदत करतात. मजबूत हाडे केवळ शरीराला आधार देत नाहीत तर स्नायू, दात आणि सांधे यांचे संरक्षण करण्यास देखील मदत करतात.
वाढत्या वयानुसार हाडांची घनता कमी होते, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस आणि सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
काळ्या मनुक्यात भरपूर पोषक तत्वे असतात. त्यात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात. जे सर्व हाडे मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
याव्यतिरिक्त काळे मनुक्यात बोरॉन नावाचे खनिज असते. जे हाडांमध्ये कॅल्शियम वाढवते. त्यामुळे हाडे लवकर कमकुवत होत नाहीत. काळ्या मनुक्यात अँटीऑक्सिडंट्स आढळतात यामुळे जळजळ कमी करतात, त्यामुळे हाडे आणि सांधेदुखी टाळतात.
८ ते १० मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. अशा प्रकारे मनुके खाल्ल्याने शरीराला सर्व पोषक तत्वे शोषण्यास मदत होते. काळे मनुके दूध, ओट्स, सॅलड किंवा दहीमध्ये मिसळूनही खाऊ शकता.