Property : होम लोन पूर्ण फेडल्यानंतर खरंच तुम्ही घर मालक होता का? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Bharat Jadhav

डोक्याला हात मारण्याची वेळ येईल

घर, फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. आपल्यातील अनेकजण होम लोन घेऊन घराचं स्वप्न पूर्ण करतात. होम लोनची परतफेड झाली तर लगेच मालकी हक्क आपल्याला मिळते असा अनेकांचा समाज असतो, पण असं गृहीत धरून निवांत बसणे तुमची मोठी चूक ठरू शकते.

कागदपत्रे आवश्यक

गृहकर्जाचा शेवटचा हप्ता भरल्यानंतर तुमचे कर्ज ऑफिशिअली बंद झाले आहे याची पडताळणी करण्यासाठी तुमच्याकडे बँकेची काही महत्त्वाची कागदपत्रे घ्यावी लागतात. यासह तुम्ही सगळ्या आर्थिक नोंदीही अपडेट केल्या पाहिजे, जे वेळेवर न केल्यास घर विकताना, नवीन कर्ज मिळवताना किंवा मालमत्तेची मालकी सिद्ध करताना समस्या निर्माण होऊ शकतात.

प्रॉपर्टीची मूळ कागदपत्रे

होम लोनचा शेवटचा हप्ता भरल्यानंतर सर्वप्रथम बँकेकडून मालमत्तेची सर्व मूळ कागदपत्रे घ्यावीत. यात Sale Deed, मालकी हक्कपत्र, वाटप पत्र, बिल्डर-खरेदीदार करार, ताबा पत्र, मंजूर बांधकाम आराखडे मिळवून घ्या.

होम लोन क्लोजर

गृहकर्ज फेडल्यानंतर बँकेकडून लोन क्लोजर सर्टिफिकेट किंवा नो ड्यूज सर्टिफिकेट (NDC) घ्या. या पत्रातून तुमचे गृहकर्ज पूर्णपणे फेडले गेले आहे. तुमच्याकडे कोणतीही थकबाकी नाही. याचा हा पुरावा असतो.

ना हरकत प्रमाणपत्र

तुमचे गृहकर्ज फेडल्यानंतर बँकेकडून NOC नक्की घ्या, जे बँकेने तुमच्या मालमत्तेवरील हक्क सोडून दिला आणि त्यावर बँकेचे कोणतेही अधिकार किंवा थकबाकी राहिलेले नाही याचा पुरावा असतो.

मॉर्गेज/चार्ज काढल्याची खात्री करा

तुमच्या कर्जाचे हप्ते फेडल्यानंतर बँकेने तुमच्या मालमत्तेवरील मॉर्गेज, भार किंवा धारणाधिकार अधिकृत काढून टाकला आहे का, हेही तपासा. काही प्रकरणांमध्ये यामध्ये संबंधित सरकारी नोंदी अपडेट करणेही गरजेचे असते.

मालमत्तेच्या नोंदी अपडेट करायची कागदपत्रे

काही राज्यांमध्ये होमलोन संपल्यानंतर जमीन किंवा मालमत्तेच्या नोंदींमधून बँकेचा चार्ज काढून टाकण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामुळे या प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. याचीही बँकेला विचारणा करावी. जेणेकरून सरकारी नोंदी अपडेट झाल्याची खात्री होईल.

अंतिम कर्ज विवरण

बँकेकडून अंतिम कर्ज विवरण मिळवण्याची खात्री करा, ज्यामध्ये त्यात कर्ज खाते क्रमांक, एकूण गृहकर्जाची रक्कम, ईएमआयची नोंद, शून्य शिल्लक आणि कर्ज बंद होण्याची तारीख नमूद असेल. गृहकर्जाच्या हप्त्यांसाठी ECS, NACH, ऑटो-डेबिट किंवा पोस्ट-डेटेड चेक वापरले असतील, तर बँकेकडून रद्द झाल्याची लेखी पुष्टी करून घ्या.

हेही वाचा

येथे क्लिक करा

भाड्याच्या घरातील दुरुस्ती अन् रंगकामाचा खर्च कोण करणार, भाडेकरू की घरमालक?