ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवल्यास घरामघ्ये सुख शांती आणि सकारात्मक वातावरण राहातं.
तुमच्या घरातील टीव्ही नेमकं कोणत्या दिशेला ठावावा? असा प्रश्न पडतो.
घरामध्ये टीव्ही लावताना अनेकदा आपण त्याच्या दिशेची विशेष काळजी घेत नाही.
परंतु, वास्तुशास्त्रानुसार टीव्ही योग्य दिशेला ठेवल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
टीव्ही अशा जागेवर ठेवा की टीव्ही पाहणाऱ्या व्यक्तीचे तोंड दक्षिणेकडे असेल.
बेडरूममध्ये टिव्हि लावणं अशुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या रुममध्ये टिव्हि लावणं टाळा.
दक्षिण-पूर्व दिशेला टीव्ही ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.