Health Care : सतत तासनतास एकाच जागी बसून काम करता? 'ही' ६ लक्षणे देतायत गंभीर आजारांचा इशारा

Alisha Khedekar

सतत बसून राहणे धोकादायक!

दीर्घकाळ एकाच जागी बसल्याने पायांमधील रक्तप्रवाह मंदावू शकतो. त्यामुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.

healthy blood circulation | Google

रक्ताच्या गुठळ्या म्हणजे काय?

रक्त घट्ट होऊन त्याची गुठळी तयार होण्याला ब्लड क्लॉट म्हणतात. या गुठळ्या प्रामुख्याने पायांच्या खोल नसांमध्ये होऊ शकतात.

Early warning signs of blood clots | Google

पायांना सूज येणे

एका पायाला अचानक सूज येणे हे रक्ताच्या गुठळीचे संभाव्य लक्षण असू शकते. असे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

Early warning signs of blood clots | Google

वेदना आणि जडपणा

पायाच्या पोटरीमध्ये वेदना, जडपणा किंवा स्पर्श केल्यावर दुखणे जाणवू शकते. ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.

Early warning signs of blood clots | Google

फुफ्फुसांनाही धोका!

रक्ताची गुठळी फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास पल्मोनरी एम्बोलिझम होऊ शकतो. अचानक श्वास घेण्यास त्रास झाल्यास तातडीने आपत्कालीन मदत घ्या.

Early warning signs of blood clots | Google

दर अर्ध्या तासाने हालचाल करा

सतत बसून काम करत असल्यास दर ३० ते ६० मिनिटांनी उठून थोडे चालावे. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

Early warning signs of blood clots | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Early warning signs of blood clots | Google

NEXT : जुना फोन विकायला काढताय? त्या आधी करा 'या' ६ गोष्टी, नाहीतर होईल डेटा लीक

Tech Tips | AI Image
येथे क्लिक करा