Siddhi Hande
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या नेहमी चर्चेत असतात. त्या सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे सुपुत्र रेहान वाड्रा यांचा साखरपुडा झाला आहे.
रेहान यांनी अवीवा बेग यांच्याशी साखरपुडा केला आहे. रेहान यांनी अवीवा बेग यांना लग्नाची मागणी घातली होती.
रेहान वाड्रा यांच्या लग्नामुळे गांधी आणि वाड्रा कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
अवीवा बेग या मूळच्या दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब आणि वाड्रा कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध आहेत.
अवीवाचे शिक्षण दिल्लीतील प्रतिष्ठित मॉडर्न स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून मिडिया कम्युनिकेशन आणि जर्नलिझममध्ये पदवी प्राप्त केली.
अवीवा व्यावसायिक फोटोग्राफर आहेत. त्यांची छात्राचित्रे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाली आहेत.
अवीवा बेग या राष्ट्रीय स्तरावर फुटबॉलदेखील खेळायच्या. रेहान आणि अवीवा हे अनेक वर्षांपासून सोबत आहेत.