Manasvi Choudhary
अभिनेत्री प्रिया बापट कायमच चर्चेत असते.
नुकतीच प्रिया बापटची नवी वेबसीरिज रिलीज झाली आहे. अंधेरा असं तिच्या वेबसीरिजचं नाव आहे.
दरम्यान प्रिया बापटची एक मुलाखत चांगलीच व्हायरल होत आहे.
मुलाखतीमध्ये प्रियाने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.
एके दिवशी शुटिंगवरून परतत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या छातीच्या भागाला स्पर्श केला.
मी फोनवर मैत्रिणीशी बोलत होते. तो माझ्या समोर आला असे तिने सांगितले.
पुढे तिने सांगितले तो व्यक्ती लगेचच काही सेंकदात पळून गेला. तेव्हा मी गडबडली मला काय झाले हेच कळले नाही.
मात्र जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा ती व्यक्ती तेथे नव्हती. या घटनेचा राग आजही माझ्या मनात आहे. असं ती म्हणते आहे.