Bharat Jadhav
वरिष्ठ विशेष सल्लागार पद म्हणजे डाउनिंग स्ट्रीट चीफ ऑफ स्टाफ. पंतप्रधान कार्यालय हे औपचारिकपणे कॅबिनेट कार्यालयाचा भाग असल्याने, ते थेट कॅबिनेट सचिवांना अहवाल देत असते.
देशातील सर्वात मोठ्या कार्यालय म्हणजे पंतप्रधान कार्यालयात पर्सनल सेक्रेटरी याचा जॉब असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्सनल सेक्रेटरी 2014 बॅचचे IFS अधिकारी निधी तिवारी या आहेत.
पर्सनल सेक्रेटरी पद कसे भरले जाते ? त्यांच्यावर कोणत्या कामाची जबाबदारी असते. त्यांना किती पगार मिळतो, काय सुविधा मिळतात हे पाहूयात.
पर्सनल सेक्रेटरी पंतप्रधानांचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविण्यास मदत करत असतो. ही व्यक्ती त्यांचे शेड्युल, मिटींग्स, दौरे, फाईल्स, सरकारी विभागातून येणारी माहिती आणि मोठ्या निर्णयांची तयारी. देश-विदेशाची बैठका आणि दौऱ्यांचा प्लान तयार करणे.
या पदासाठी सर्वसाधारणपणे IAS, IFS वा IRS सारख्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी निवडले जातात. टॉप क्लासचे अधिकाऱ्यांना हे पद मिळते. त्यांच्याकडे 15-20 वर्षांचा अनुभव असेल आणि मोठे प्रशासकीय निर्णय, धोरणे आणि सरकारी यंत्रणेमध्ये मोठी भूमिका निभावली असेन. जे गुप्त आणि संवेदनशील प्रकरणे संपूर्ण सर्तकपणे सांभाळू शकतील.
या पदावर सर्वसाधारणपणे वरिष्ठ IAS-IFS अधिकारी असतात. त्यांचे वेतनही त्यांच्या रँक नुसार ठरत असते. त्यांची सरासरी सॅलरी 1.5 लाख ते 2.5 लाख रुपये महिना असते. यासह त्यांना सरकारी घर, कार, सिक्युरिटी, मेडिकल सुविधा आणि अधिकृत परदेश प्रवासाचे फायदे मिळतात.
या पदापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना UPSC नागरी सेवा परीक्षा द्याव्या लागतात. यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असतो. UPSCच्या परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांनी पदवीचं शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे.
यासाठी उमेदवाराला सामान्य अभ्यास, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, संविधान, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांमध्ये कसून तयारी करावी लागते.