Egg Palak Curry: घरीच बनवा ढाबा स्टाईल चवदार अंडा पालक करी

Bharat Jadhav

जीभेवर राहील चव

ढाबा स्टाईलची अंडी पालक करी बनवण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची चव थेट हृदयाला स्पर्श करते. रेसिपीमुळे सामान्य पालक इतका चविष्ट बनेल की अनेकजण तुम्हाला त्याची रेसिपी विचारतील. त्याची घट्ट आणि मसालेदार ग्रेव्ही जी अंड्यांसोबत अप्रतिम लागते.

पालक उकाळून घ्या

या डिशसाठी आधी पालक चांगले धुवून टाका.नंतर हलक्या पद्धतीनं उकाळून घ्या. एक मिनीट उकाळणं पुरेसे आहे. नाहीतर जास्त वेळ उकाळल्यानं पालकची चव कमी होत असते.

हिरवा रंग गडद राहण्यासाठी

पालक उकळल्यानंतर लगेचच ते थंड पाण्यात टाका, जेणेकरून त्याचा हिरवा रंग ढाब्यासारखाच चमकदार राहील.

अंडी तेलात फ्राय करा

२ ते ३ उकडलेले अंड्यावरचे टरफल काढून टाका. अंड्यांना छोटे छोटे काप करा. एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा आणि अंडी सोनेरी तपकिरी होईपर्यंत हलके तळा म्हणजेच फ्राय करा.

खडा मसाला गरम करा

एका कढईत तेल गरम करा आणि त्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी आणि लवंगा घाला. जिरे तडतडले की, कांदा घाला आणि हलके तपकिरी होईपर्यंत परतून घ्या.

मसाल्यात आले-लसूण पेस्ट घाला

खडा मसाला गरम केल्यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट घाला. त्याचा कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत परतून घ्या. या बेसमुळे करीला ढाबाची समृद्ध चव येते.

मसाले शिजवून घ्या

त्यात आता मसाले घाला. यात हळद, धणे, लाल मिरची, काश्मिरी मिरची आणि थोडा गरम मसाला घालून चांगले परतून घ्या. तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घ्या.

पालक प्युरी

त्याआधी उकाळलेला पालक मिक्सरमध्ये बारीक बारीक करा. खूप बारीक प्युरी बनवू नका, कारण ढाबा-शैलीच्या ग्रेव्हीसाठी हलका पोत चांगला असतो. साला शिजवला गेला की त्यात प्युरी केलेलं पालक मिसळा आणि थोडे पाणी घाला आणि घट्ट, क्रिमी ग्रेव्ही तयार होऊ द्या.

तयार आहे ढाबा स्टाइल पालक अंडा करी

जेव्हा ग्रेव्ही उकळू लागते तेव्हा त्यात तळलेले अंडे घाला. गॅस कमी करा आणि ५ ते ७ मिनिटे शिजू द्या, जेणेकरून अंडी पालक मसाल्याची पूर्ण चव शोषून घेतील. त्यावर थोडी कसुरी मेथी आणि एक चमचा क्रीम घाला, यामुळे लगेचच ढाब्यासारखी चव येईल.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Skin Care: चांगल्या आरोग्यासह चेहरा करी गोरा; तुमच्या रुपासमोर परीही ठरेल फेल