Skin Care: चांगल्या आरोग्यासह चेहरा करी गोरा; तुमच्या रुपासमोर परीही ठरेल फेल

Bharat Jadhav

औषधी मसाले

आयुर्वेद भारतीय स्वयंपाकघरांमध्ये आढळणारे मसाले औषधी मानतो. हे मसाले संसर्ग आणि अनेक रोग बरे करण्यास उपयुक्त असतात.

जायफळ

मसाल्यातील असाच एक सुगंधी आणि तिखट मसाला म्हणजे जायफळ. जायफळ पोटाच्या समस्यांपासून ते त्वचेच्या आजारांपर्यंत विविध आजारांपासून बचाव करतं.

आयुर्वेदिक रत्न

आयुर्वेदात जायफळाला "आयुर्वेदिक रत्न" म्हटले जाते. ते शरीर, मन आणि आत्म्यासाठी अमृत मानले जाते.

जायफळ एक उपाय अनेक

जायफळमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच त्याचे न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म मेंदू संतुलित करण्यास आणि ताण कमी करण्यास मदत करतात.

पचनसंस्था मजबूत करते

जायफळमध्ये पचनसंस्था मजबूत करणारे गुणधर्म देखील असतात. आणि ते शरीरात असलेल्या हानिकारक बॅक्टेरियांना नष्ट करण्यास देखील मदत करते.

निंद्रानाश Insomnia

जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर रात्री दुधात जायफळची पावडर मिसळा आणि ते दूध प्या. यामुळे आराम मिळेल. जायफळ मन शांत करण्यास मदत करते, त्यामुळे चांगली झोप येते.

काळे डाग दूर चेहरा करी गोरा

चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग दूर करण्यासाठी जायफळ उपयुक्त आहे. काळे डाग दूर करण्यासाठी कच्च्या दुधात थोडे जायफळ किसून घाला. मग ही पेस्ट काळे डाग किंवा मुरुमवरती लावा आणि १० मिनिटांनंतर ते धुवून काढा. धुतल्यानंतर, जळजळ कमी करण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर कोरफडीचा लेप लावा.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Property Rights: दोन बायका असणाऱ्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीचे विभाजन कसे होते?