Tanvi Pol
श्रावण महिन्यात उपवासांची रेलचेल असते आणि रोज नवीन उपवासाचे पदार्थ करणे वेळखाऊ ठरू शकते.
म्हणूनच श्रावण सुरु होण्याआधीच काही खास उपवासाचे पदार्थ तयार करून ठेवाच.
शेंगदाण्याचं कूट, साबुदाणा पीठ, राजगिरा पीठ, उपवासाची भाजणी अशा गोष्टी आधी करून ठेवा.
सुकट भगर आणि लाडूही करून ठेवल्यास उपवासात पटकन उपयोग होतो.
साखरपाकातले सुके शंकरपाळे, खजूर-ड्रायफ्रूट लाडू असे पदार्थ तयार ठेवता येतात.
लोणचं, दही आणि ताक यासारखी चविष्ट पण उपयुक्त गोष्टीही आधीच साठवून ठेवा.
या तयारीमुळे उपवासाचे दिवस होतील सोपे, चविष्ट आणि झटपट.