Siddhi Hande
ऑफिसमध्ये अनेकजण इतर सहकाऱ्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना तुम्ही कधीच पुढे जाऊ नये, असं वाटते.
अनेक कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात राग धरतात. त्यांना कधीच पुढे जाऊन देत नाही.
दरम्यान, ऑफिसमध्ये बॉसची चापलूसी करुन काही व्यक्ती काम करुन घेतात तेव्हा आपण काय करायचं, यावर प्रेमानंद महाराजांनी एक सल्ला दिला आहे.
प्रेमानंद महाराज म्हटले की, तुम्ही खऱ्या बॉसचा विचार करा. त्याच्या मागे धावा. खोट्या बॉसला कोणीही फसवू शकतात.
खऱ्या बॉसकडे कोणत्याही प्रकारची चापलुसी चालत नाही.
जर तुम्ही तुमच्या खऱ्या बॉसला खूश केले तर आपोआप हे खोटे बॉसदेखील तुमच्यामागे येतील.
देव ज्या व्यक्तीवर कृपा करते, त्यावर सर्वांचीच कृपा असते. त्यामुळे नेबमी देवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या आयुष्यात एकच साहेब आहे. ते असे आहेत की, तुमच्याकडून कितीही चुका झाल्या तरी तुमची साथ कधीच सोडत नाही. तो म्हणजे देव.
तुम्हाला माणसांमध्ये स्वार्थी, कपटी,धूर्तपणा दिसेल. जो चुक झाल्यावर तुमची साथ सोडेल.
त्यामुळे तुम्ही तुमच्या खऱ्या बॉसची संवाद साधा. बॉसचा बॉस म्हणजे देव. देवाची कृपा मिळवा.