Manasvi Choudhary
गर्भारपणाचा काळ हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा असतो. या नऊ महिन्यांत महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात अनेक मोठे बदल होतात.
प्रेग्नेसीमध्ये महिलांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते, कारण आईच्या आरोग्याचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या विकासावर होत असतो.
गर्भारपणात महिलांचा रक्तदाब किती असावा आणि बीपी वाढल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सामान्यतः निरोगी व्यक्तीचा रक्तदाब 120/80 mmHg इतका मानला जातो. प्रेग्नेसीच्या काळात महिलांचा योग्य रक्तदाब सामान्यतः 120/80 mmHg पेक्षा कमी असणे उत्तम मानले जाते.
जर गरोदरपणात बीपी सतत 140/90 mmHg किंवा त्याहून अधिक असेल, तर उच्च रक्तदाब असते. अशावेळी आरोग्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.
१) गर्भारपणात रक्तदाब वाढल्यास डोकेदुखी जाणवते.
२) शरीरात अचानक खूप जास्त पाणी साचल्यामुळे हात, पायांवर किंवा चेहऱ्यावर सूज येते.
३) बीपी वाढल्याने चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधार येणे
४) काही महिलांना तीव्र स्वरूपात मळमळणे, उलट्या होणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा समस्या जाणवतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.