Rohini Gudaghe
प्री-वेडिंग शूटसाठी लोणावळ्यातील पवना तलाव हे ठिकाण चांगलं आहे.
पुण्याजवळील लवासा सिटी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. युरोपियन-प्रेरित आर्किटेक्चर, लेकसाइड प्रोमेनेड्स आणि रंगीबेरंगी इमारती प्री-वेडिंग फोटोशूटसाठी खास आहेत.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया एक शाही आणि ऐतिहासिक लूक प्रदान करते.
साताऱ्यातील कास पठारावर रोमँटिक फोटोशूटसाठी नयनरम्य वातावरण आहे.
पुण्यातील आगा खान पॅलेस चांगलं ठिकाण आहे. प्रेमाचे क्षण कॅप्चर करण्यासाठी हे खास ठिकाण आहे.
निसर्गाच्या सानिध्यात प्री-वेडिंग शूटसाठी खंडाळा आणि लोणावळा हिल स्टेशनला भेट द्या. हिरवेगार टेकड्या, धबधबे आणि धुके रोमँटिक वातावरण तयार करते.
नाशिकच्या द्राक्षबागा जगप्रसिद्ध आहेत. तुम्ही तुमचं रोमँटिक प्री-वेडिंग शूट या ठिकाणी करू शकता.
पुण्यातील शनिवार वाडा ऐतिहासिक भव्य वास्तू आहे. तेथे तुम्ही प्री-वेडिंग शूट करू शकता.
अलिबाग बीचवर सोनेरी वाळू, स्वच्छ निळे पाणी दिसते. त्यामुळं हे ठिकाण प्री-वेडिंग फोटोशूटसाठी रोमँटिक वातावरण प्रदान करतं.