ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक पुरुषांना पँटच्या मागच्या खिशात पैशाचं पाकिट ठेवण्याची सवय असते.
मात्र तुम्हाला माहिती आहे का ही सवय तुमच्या आरोग्यासाठी कशी घातक ठरु शकते.
चला तर मग पाहूयात पँटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने काय होऊ शकते.
पुरुष महत्त्वाच्या कागदपत्रांपासून ते पैशांपर्यंत सर्व कार्ड त्यांच्या पाकिटात ठेवतात.
जाड वॉलेट ठेवल्यामुळे तुमच्या बसण्याच्या पोझिशनवर परिणाम होतो.
पँटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने अनेक लोक फॅट वॉलेट सिंड्रोमला बळी पडत आहेत.
पेल्व्हिस हे बेसिनच्या आकाराचं हाड असतं, जे आपल्या स्पायनल कॉलम आणि पोटातील अवयवांना आधार देतं.
ते मणक्याच्या खालच्या भागात असतं. त्यामुळे पेल्व्हिसला होणाऱ्या नुकसानाचे गंभीर परिणाम होतात.
तसेच पाठ दुखणं, डीजनरेशन आणि सायटिका अशा विविध आजार मागे लागू शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.