Satara Tourism : मराठा साम्राज्याचा अभिमान, साताऱ्यातील 'या' किल्ल्यावरून दिसतो कोकण किनारा

Shreya Maskar

सातारा

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरपासून २१-२४ किमी अंतरावर प्रतापगड किल्ला वसलेला आहे. प्रतापगड किल्ला इतिहासातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे.

Satara Tourism | google

प्रतापगड किल्ला

प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये जावळीचे खोरे जिंकल्यानंतर मोरोपंत पिंगळे यांच्याद्वारे बांधून घेतला.

Pratapgad Fort | google

अफजल खानाशी लढाई

१६५९ मध्ये अफजल खानाशी झालेल्या लढाईचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला प्रतापगड किल्ला प्रसिद्ध आहे. प्रतापगड किल्ला आपल्या विहंगम दृश्यांसाठी आणि येथील भवानी देवीच्या मंदिरासाठी ओळखला जातो.

The Battle with Afzal Khan | google

कोकण किनारा

प्रतापगड किल्ल्यावरून सुंदर कोकण किनारा पाहायला मिळतो. या किल्ल्याच्या खालच्या भागातून निळसर समुद्र आणि सह्याद्रीच्या रांगांचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

The Konkan Coastline | google

थंड हवेचे ठिकाण

प्रतापगड किल्ला प्रसिद्ध हिल स्टेशन महाबळेश्वर जवळी आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटो क्लिक करू शकता.

A Cool Retreat | google

जागतिक वारसा स्थळ

प्रतापगड किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (२०२४-२५) समाविष्ट असलेल्या १२ 'मराठा लष्करी भूदृश्य' किल्ल्यांपैकी एक आहे. प्रतापगड किल्ला १७ व्या शतकातील आहे.

World Heritage Site | google

उंची किती?

प्रतापगड किल्ल्याच्या बुरूजांवरून दिसणारी दरीची विहंगम दृश्य पाहून तुम्ही भारावून जाल. प्रतापगड किल्ल्यावर १७ फूट उंच अश्वारूढ असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे.

fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Pratapgad | google

NEXT : पुण्यातील 'या' किल्ल्यावर घडली इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना, 'सिंहाचा गड' म्हणून ओळखले जाते ठिकाण

Sinhagad Fort | saam tv
येथे क्लिक करा...