Shreya Maskar
प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणापासून सुमारे २४ किमी अंतरावर वसलेला आहे. हा एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे.
महाबळेश्वर हे 'स्ट्रॉबेरीची भूमी' म्हणून जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले हे लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण येथील विहंगम दृश्ये दाखवणाऱ्या ठिकाणांसाठी, आल्हाददायक हवामानासाठी, प्राचीन मंदिरांसाठी आणि मुंबई -पुणे शहरांजवळील एक प्रमुख ट्रेकिंग स्थळ म्हणून ओळखले जाते.
प्रतापगड किल्ल्यावर १६५९ रोजी ऐतिहासिक प्रतापगडची लढाई झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूरच्या आदिलशाही सैन्याचा सरदार अफझलखान यांच्यात ही लढाई झाली, ज्यात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अफझलखानाचा वध करून दणदणीत विजय मिळवला.
शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांनी १६५६ ते १६५८ या काळात या किल्ल्याचे बांधकाम केले. किल्ल्यावरून सह्याद्रीचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.
प्रतापगड किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. प्रतापगड किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे.
प्रतापगड किल्ल्यावर १७ फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे.
अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड किल्ला अशी अनेक ठिकाणे आहेत. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.