Sakshi Sunil Jadhav
तुमच्या आवडत्या कलाकाराचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी तुम्ही नेहमी उत्सुक असता.
लहानपणीचे गोड गोंडस चेहरे आता मराठी सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत.
तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, या फोटोतली ही अभिनेत्री कोण आहे? चला जाणून घेऊयात.
प्राजक्ता माळीचा बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती आईसोबत दिसते.
नांरगी रंगाच्या साडीमध्ये हात जोडून दिलेली तिची क्यूट पोज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
प्राजक्ता माळी ही अभिनेत्री जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून प्राजक्ता घराघरात लोकप्रिय झाली.
महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सूत्रसंचालक म्हणून तिची वेगळी ओळख निर्माण झाली.
मराठी चित्रपटांमध्येही तिने विविध भूमिका साकारून अभिनयाची छाप सोडली. ‘फुलवंती’ चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत यश मिळवलं.
रानबाजारसारख्या वेगळ्या विषयावरील सीरिजमधील भूमिकेने तिने सर्वांना प्रभावित केलं. आज अभिनेत्री प्राजक्ता फक्त अभिनेत्रीच नाही तर यशस्वी बिझनेसवुमन म्हणूनही ओळखली जाते.