Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.
नाटक, डान्स, चित्रपट आणि मालिका अशा विविध भूमिकेतून प्राजक्ताने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
२०१३ खो- खो पासून ते २०२४ फुलवंती पर्यंतचे तिचे सर्व चित्रपट, जुळून येती रेशीमगाठी ते रानबाजार या तिच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीने प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली आहे.
या शिवाय प्राजक्ता माळी सूत्रसंचालन, डान्स शो मधून देखील झळकली. व्यवसायक्षेत्रात प्राजक्ता माळीने तिचा ठसा उमटवला आहे.
प्राजक्ता माळीचा स्वत:चा दागिन्याचा बिझनेस आहे. प्राजक्तराज असं तिच्या दागिना ब्रँडचं नाव आहे. अस्सल मराठमोळे दागिने तिच्याकडे आहेत.
सोशल मीडियावर लाखो नेटकऱ्यांची ती चाहती आहे. २ मिलियनच्या पेक्षा अधिक तिचे फॉलोअर्स आहेत. चाहत्यांना दैंनदिन अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देते..
नुकतेच तिने 'Ask Me Question' च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिच्या एका चाहत्याने, आता कोणती नवीन चित्रपट किंवा सिरीज येणार आहे का? असं विचारले.
यावर प्राजक्ताने उत्तर देत म्हटलं की, हो, बहुतेक जूननंतर.. माझा चित्रपट प्रदर्शित होईल. असं म्हटलं आहे.
त्यामुळे प्राजक्ता माळी आता लवकरच नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.