Shruti Vilas Kadam
प्राजक्ता माळीने मुंबईच्या गजबजाटापासून दूर कर्जतमध्ये सुंदर आणि शांत परिसरात तिचं स्वप्नातील फार्महाऊस उभारलं आहे.
आजूबाजूला हिरवीगार झाडं, मोकळी जागा आणि शांत वातावरण असल्याने हे फार्महाऊस रिलॅक्स होण्यासाठी उत्तम ठिकाण ठरतं.
घराच्या इंटिरियरमध्ये आधुनिक डिझाइनसोबतच साधेपणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे घराला आकर्षक आणि उबदार लूक मिळाला आहे.
फार्महाऊसभोवती मोठं गार्डन, हिरवळ आणि मोकळी जागा असल्यामुळे निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो.
प्राजक्ता माळीने फार्महाऊसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाला की प्राजक्ता या फार्महाऊसमध्ये निवांत वेळ घालवत असल्याचं तिच्या पोस्टमधून दिसून येतं.
येथे मुक्कामासाठी शनिवार आणि रविवारी एका दिवसाचे भाडे सुमारे 30 हजार रुपये आहे. तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत एका दिवसासाठी 17 हजार ते 20 हजार रुपये इतके भाडे आकारले जाते असा अंदाज आहे.