Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ज्वेलरी ब्रँड आहे. प्राजक्ताच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव प्राजक्तराज आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीला दागिन्यांची प्रचंड आवड आहे. सध्या ग्लॅमरच्या दुनियेत महाराष्ट्राची ओळख असलेले दागिने नव्या तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तिने ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे.
प्राजक्ता माळीच्या ज्वेलरी ब्रँडमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख असलेले पारंपारिक दागिने आहेत.
'प्राजक्तराज'मध्ये केवळ नेहमीचेच दागिने मिळत नाहीत, तर पेशवाई आणि शाहूकालीन काळातील दुर्मिळ दागिन्यांचे डिझाइन्स आहेत.
प्राजक्ता माळीने हिरव्या साडीवर मोहनमाळ, बकुळीहार, कुंदनमयुरनथ, गादी ठूशी, सरी, बोरमाळ, नथ हे दागिने घातले आहेत.
खणाच्या साडीवर प्राजक्ताने नागोत्र, पुरणपाटल्या, चितांग, मोकळ्या घसाची वज्रटीक, जोडवी, गजरी पैंजण, मासोळी, मोकळ्या घ्यायची वज्रटिक, नथ, गहू तोडे, पुरणपाटली, एकदाणी
गुलाबी साडीवर प्राजक्ताने बदामपेटी, सरी , नमस्कारतोडे बाजूबंद , मोतीबांगडी , गहूमाळ, तारामंडळ , गहूतोडे, मोतीबाजूबंद , मोतीबांगडी दागिने घातले आहेत.
प्राजक्ताने कोल्हापूरीसाज , शिंदेशाहीतोडे ,तारामंडल , एकदाणी , नथ , गहूतोडे , कुडीअंगठी, कंपरपट्टा , चॉकलेटी साडी