Prajakta Mali: १३ वर्षांपूर्वीच्या प्राजक्ता माळीला ओळखणंही कठीण; 'जुळून येती रेशीमगाठी'मधील फोटो व्हायरल

Shruti Vilas Kadam

१३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र

प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर तब्बल १३ वर्षांनंतर ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या चित्रपटातून पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

Prajakta and Lalit | Saam Tv

‘जुळून येती रेशीमगाठी’ची लोकप्रिय जोडी

या मालिकेत प्राजक्ताने मेघना तर ललितने आदित्यची भूमिका साकारली होती. त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

Prajakta and Lalit | Saam Tv

जुन्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

नव्या चित्रपटाची घोषणा होताच प्राजक्ता माळीचे १३ वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali Old Photos | Pintrest

प्राजक्ताचा क्यूट लूक

जुन्या फोटोंमध्ये प्राजक्ताचा साधा, निरागस आणि क्यूट अंदाज पाहायला मिळतो. तिच्या जुन्या लूकची नेटकऱ्यांमध्ये विशेष चर्चा आहे.

Prajakta Mali Old Photos | Pintrest

जुन्या आठवणींना उजाळा

प्राजक्ता आणि ललित पुन्हा एकत्र येणार असल्याने ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील आदित्य-मेघनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

Prajakta Mali Old Photos | Pintrest

‘द ओजी जोडी इज बॅक’

नव्या चित्रपटाची घोषणा करताना प्राजक्ताने ‘The OG Jodi is back’ अशी खास टॅगलाइन वापरली. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.

Prajakta and Lalit | Saam Tv

‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ची उत्सुकता

या चित्रपटातून प्राजक्ता आणि ललित पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असून, त्यांची नवी केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Prajakta and Lalit | Saam Tv

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रेंग्रन्स राहील दिवसभर!

Perfume Tips | Saam Tv
येथे क्लिक करा