Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Shruti Vilas Kadam

पल्स पॉइंट्सवर परफ्युम लावा

मनगट, कानामागील भागावर, गळ्यावर आणि कोपराच्या आतील घडीवर यांसारख्या पल्स पॉइंट्सवर परफ्युम लावल्यास सुगंध अधिक प्रभावीपणे जाणवतो.

Why does perfume fragrance fade over time | Saam tv

त्वचा मॉइश्चराइज करा

कोरड्या त्वचेपेक्षा मॉइश्चराइज्ड त्वचेवर परफ्युमचा सुगंध अधिक काळ टिकण्यास मदत होते.

Why does perfume fragrance fade over time | Google

अंघोळीनंतर वापरा

त्वचा स्वच्छ असताना आणि घाम येण्यापूर्वी परफ्युम लावणे योग्य मानले जाते.

Why does perfume fragrance fade over time | Google

परफ्युम चोळू नका

मनगटावर परफ्युम स्प्रे केल्यानंतर दोन्ही मनगट चोळल्यास सुगंध अधिककाळ टिकत नाही.

Why does perfume fragrance fade over time | Google

जास्त परफ्युम वापरणे टाळा

सुगंध जास्त काळ टिकावा म्हणून अनेक स्प्रे करण्याची गरज नाही. जास्त प्रमाण त्वचेवर जळजळ किंवा अॅलर्जी निर्माण करू शकते.

Perfume | yandex

संवेदनशील भागांवर थेट स्प्रे करू नका

चेहरा, डोळ्यांभोवती, काख आणि इतर संवेदनशील भागांवर परफ्युम थेट लावणे टाळावे. परफ्यूम मारताना बाटली त्वचेपासून किमान १५ सेंटीमीटर (सुमारे ६ इंच) अंतरावर धरावी.

Night Perfume Time | GOOGLE

नवीन परफ्युमची पॅच टेस्ट करा

नवीन परफ्युम वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी करा. खाज, जळजळ किंवा पुरळ दिसल्यास वापर टाळा.

Perfume at Night | GOOGLE

Heart Health Tips: हार्ट अटॅकचा धोका कमी करायचा? आहार-व्यायामासोबत रोजच्या सवयींमध्ये करा 'हे' 5 बदल

Heart Health Tips | Saam Tv
येथे क्लिक करा