Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ताने मराठी सिनेसृष्टीत स्वताची विशेष ओळख निर्माण केली आहे.
केवळ अभिनयातूनच नाहीतर विविध मार्गातून प्राजक्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. प्राजक्ता माळी ही अभिनेत्री, बिझनेस वूमन, नृत्यागंणा आहे.
तुम्हाला माहितीये का? अभिनेत्री प्राजक्ता माळीचा स्वत:चा फार्महाऊस आहे. अनेकदा चित्रपटाच्या शुटींगनंतर प्राजक्ता माळी आराम करण्यासाठी फार्महाऊसला भेट देते.
प्राजक्ता माळीचा फार्महाऊजचं नाव प्राजक्तकुंज असं आहे. निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने समृद्ध अश्या ठिकाणी प्राजक्ताचं फार्महाऊस आहे.
निसर्गाच्या कुशित प्राजक्ता माळीचं फार्महाऊस आहे. प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये ३ बेडरुम, ४ बाथरुम आमि लिव्हिंग रुम आहे. त्याचसोबत फार्म हाऊसबाहेर बाहेर फॅमिली लंच किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सुंदर जागा आहे.
प्राजक्तकुंज फार्महाऊसमध्ये राहण्यासाठी दिवसाला १५ हजार ते ३० हजार रुपयांना खर्च येतो. याचसोबत इथे खाण्याची उत्तम सोय आहे.