Sakshi Sunil Jadhav
अभिनेत्री प्राजक्ता कोळीने तिच्या नावावर एक मोठी कामगिरी नोंदवली आहे.
टाइम मॅगझिनने २०२५ च्या टाइम १०० क्रिएटर्स लिस्टमध्ये प्राजक्ताचा समावेश केला आहे.
प्राजक्ता कोळी ही एकमेव आणि भारतातली पहिली कंटेंट क्रिएटर आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ता कोळीने चाहत्यांसह ही बातमी शेअर केली आहे.
प्राजक्ता कोळीने या यशामागे तिला प्रेक्षकांची खूप साथ मिळाली असे म्हणत त्यांचे आभार मानले आहेत.
प्राजक्ता कोळीने नेटफ्लिक्सच्या 'मिसमॅच्ड' या वेब सिरीजमध्ये काम करून चाहत्यांच्या मनावर राज्य केले.
अभिनेत्री प्राजक्ता कोळीने याशिवाय वरुन धवनच्या 'जुग जुग जिओ' आणि विद्या बालनच्या 'नियत' या चित्रपटातही काम केले आहे.
सध्या प्राजक्ताचे युट्यूबवर ७२ लाख सबस्क्राइबर्स आहेत.
प्राजक्ता कोळीच्या युट्यूबचे नाव मोस्टलीसेम आहे. तर इंस्टाग्रामवर ८७ लाख लोक तिला फॉलो करतात.