Shreya Maskar
प्रचंडगड, तोरणा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा पुणे जिल्ह्यातील 1,403 मीटर (4,603 फूट) उंच डोंगरी किल्ला आहे. हे ठिकाण मुंबई-पुण्याजवळील बेस्ट ट्रेकिंग स्पॉट आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४६ मध्ये तोरणा किल्ल्याचे नाव बदलून 'प्रचंडगड' असे केले. पुणे जिल्ह्यातील हा अभेद्य किल्ला त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जिंकला होता. या किल्ल्याचा प्रचंड विस्तार आणि त्याची मजबूत , संरक्षण-रचना लक्षात घेऊन त्यांनी 'प्रचंडगड' हे नाव दिले.
प्रचंडगड किल्ला मूळतः १३ व्या शतकात भगवान शिवाच्या अनुयायांनी (जे 'शिवपंथ' म्हणून ओळखले जात) बांधला होता, असे बोले जाते.
प्रचंडगड किल्ल्यावरून आजूबाजूच्या दऱ्या, कोकणचा प्रदेश आणि पानशेत धरणाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे पावसाळ्यात वीकेंडला नक्की जा.
गडावर जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराला 'बिनी दरवाजा' म्हणतात. बिनी दरवाजानंतर गडाच्या आत जाण्यासाठी 'कोठी दरवाजा' हे दुसरे प्रवेशद्वार लागते.
तोरणा किल्ल्याला मजबूत तटबंदी आहे. किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी सरळसोट कातळ कडा आणि बुरुज बांधण्यात आले आहेत.
मुंबई टू पुणे रेल्वेने प्रवास करा. त्यानंतर पुणे स्टेशनला उतरून एसटीने तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.