Shruti Vilas Kadam
2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, 1 कप बारीक रवा, 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली), 1 टीस्पून जिरे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर (ऐच्छिक) तळण्यासाठी तेल
उकडलेले बटाटे सोलून चांगले कुस्करून घ्या. त्यामध्ये मीठ, जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा.
बटाट्याच्या मिश्रणात हळूहळू रवा घालून मळून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून घट्ट पीठ तयार करा.
तयार पीठाचे छोटे गोळे करून प्लास्टिक शीट किंवा बटर पेपरवर पातळ लाटून चिप्सच्या आकारात कापा.
चिप्स 2 ते 3 तास उन्हात किंवा पंख्याखाली थोडे वाळवून घ्या. यामुळे ते अधिक कुरकुरीत होतात.
कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर चिप्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढा.
गरमागरम रवा-बटाटा चिप्स टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा चहासोबत सर्व्ह करा. हे चिप्स मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.