Shruti Vilas Kadam
कन्नड सुपरस्टार यश आणि त्याची पत्नी राधिका पंडित यांनी अलिबागमध्ये सुमारे 24 कोटी रुपयांची प्रीमियम बीचफ्रंट जमीन खरेदी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील कामत गावात ही प्रॉपर्टी असून तिच्या समोर समुद्र आहे. त्यामुळे या जागेचे आकर्षण अधिक वाढले आहे.
यशने खरेदी केलेल्या मालमत्तेत कृषी भूखंडांचा समावेश आहे. या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 5,289 चौरस मीटर इतके आहे.
या व्यवहारासाठी सुमारे 1.44 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि इतर नोंदणी शुल्क भरल्याची माहिती समोर आली आहे.
अलिबागमध्ये आधीपासूनच शाहरुख खान आणि विराट कोहली यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या प्रॉपर्टी आहेत. आता यशही या यादीत सामील झाला आहे.
अलिबागमधील शांत वातावरण, समुद्रकिनारा आणि सुधारलेली कनेक्टिव्हिटी यामुळे अलिबाग हे लक्झरी हॉलिडे होम्ससाठी लोकप्रिय ठिकाण बनले आहे.
चित्रपटांबरोबरच यश आता रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या खरेदीकडे उद्योगक्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.