Shreya Maskar
जेवणानंतर लगेच शौचास होणे हे सहसा गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्समुळे (gastrocolic reflex) होते. ही समस्या जास्त वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्समध्ये पोटातील अन्न मोठ्या आतड्याला जागा मोकळी करण्यास सांगते. जेव्हा हा रिफ्लेक्स खूप तीव्र किंवा जलद असतो, तेव्हा शौचास जाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते, जी अनेकदा विशिष्ट पचनसंस्थेच्या समस्या किंवा विशिष्ट अन्नपदार्थांमुळे उद्भवते.
शौचास जाण्याची सौम्य इच्छा कोणालाही होऊ शकते. याचा अर्थ तुमचे आतडे सक्रिय आहे आणि काम करत आहे.
इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) हा पचनसंस्थेशी संबंधित एक दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये मोठ्या आतड्याच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे पोटात दुखणे, पेटके येणे, पोट फुगणे, गॅस होणे आणि अतिसार, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवतात.
गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स अनेकदा IBS शी संबंधित असतो, ज्यामुळे जेवणानंतर लगेच पोटात गोळे येणे, पोट फुगणे किंवा पातळ शौचास होणे अशी लक्षणे दिसतात.
दुग्धजन्य पदार्थ, ग्लूटेन किंवा मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थांमुळे होणाऱ्या संवेदनशील प्रतिक्रियांमुळे शौचास जलद होऊ शकते.
कमी चरबीचे पदार्थ खा, कॅफिन, अल्कोहोल, स्निग्ध पदार्थ , मसालेदार पदार्थ खाणे टाळा. फायबरयुक्त पदार्थ खा, जेणेकरून आतड्याची हालचाल स्थिर करण्यास मदत होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.