Shruti Vilas Kadam
‘कप-बशी’ चित्रपटाच्या टीझर लॉन्चवेळी पूजा सावंतने ऑफ व्हाईट रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. मोकळे केस आणि पारंपरिक महाराष्ट्रियन दागिन्यांमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत होता.
पूजाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर खास फोटो शेअर केले आहेत. “Wrapped in six yards for कप-बशी teaser launch” असं कॅप्शन देत तिने चाहत्यांचं लक्ष वेधलं.
सिंपल पण एलिगंट लूकमुळे पूजा सावंतच्या फोटोंवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिच्या पारंपरिक सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
‘कप-बशी’ या चित्रपटात पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक ट्विस्ट देण्यात आला आहे. सासू-सुनेची पत्रिका जुळली पाहिजे, या हटके अटीभोवती चित्रपटाची कथा फिरते.
या चित्रपटातून पूजा सावंतसोबत नवोदित अभिनेता ऋषी मनोहर झळकणार आहे. या नव्या जोडीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
चित्रपटात निर्मिती सावंत, नयना आपटे, अनंत जोग, आनंद इंगळे, आनंद काळे आणि उमा सरदेशमुख यांसारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
वैभव रामकृष्ण चिंचाळकर दिग्दर्शित ‘कप-बशी’ हा चित्रपट १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. टीझरनंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.