Ruchika Jadhav
एबी फॉर्ममध्ये फॉर्म ए आणि फॉर्म बी असे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत.
मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्य राजकीय पक्षाकडून मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे सांगणारा फॉर्म म्हणजे फॉर्म ए आहे.
पक्षाकडून देण्यात येणार्या ‘फॉर्म ए’मध्ये उमेदवाराचे नाव असते. त्यासह पक्षातील त्याचे पद आणि चिन्ह यांची माहिती फॉर्ममध्ये असते. अनेकदा उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर तो बाद ठरतो. त्यामुळे योग्य कागदपत्रे निवडणे महत्वाचं आहे.
फॉर्म बीमध्ये पर्यायी नावाचा पर्याय असतो. यामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव जरी बाद झाले तरी दुसऱ्या उमेदवाराला येथे पक्ष आणि चिन्हासह उभे राहता येते.
या फॉर्ममध्ये काही प्रतिज्ञापत्र असतात. ही प्रतिज्ञापत्रे सर्व भरलेली पाहीजे. यात काही चुका असल्यास देखील फॉर्म रद्द होतो.
काही वेळा उमेदवारी जाऊ नये म्हणून पर्यायात जास्त नावे दिली जातात. मात्र त्याने फॉर्ममध्ये गुंतागुंत वाढते. त्यामुळे पर्याय म्हणून फक्त १ व्यक्तीचे नाव यावर टाकून द्या.