Shreya Maskar
गणपती निमित्त बरेच लोक कोकणात गेले आहेत.
कोकणातील देवगड जवळ पोखरबाव श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे.
या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मनाला खूप प्रसन्न करतो.
हे मंदिर दाभोळे गावाकडच्या वाटेवर वसलेले आहे.
पोखरबाव गणपती मंदिराच्या बाजूलाच एक डोंगर रांग पाहायला मिळते.
कोकणातील या मंदिरात शंकराची स्वयंभू पिंड आहे.
मंदिराच्या बाजूने वाहणारा ओढा पाहून मनाला खूप शांती मिळते.
मंदिरात दर्शनाला येणारे भक्त हे पाणी तीर्थ म्हणून पितात.
या गणेश मंदिरात पाषाणाची काळी चतुर्भुज मूर्ती पाहायला मिळते.
कोकणातील अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध गणपती मंदिर आहे.
संध्याकाळचा सूर्यास्त आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे दृश्य स्वर्ग सुखाची अनुभूती करून देते.