Shruti Vilas Kadam
जाड पोहे, नाचणी पीठ, दही, किसलेली भाजी (दुधी/गाजर), हिरवी मिरची, आलं, मीठ आणि थोडं तेल तयार ठेवा.
पोहे स्वच्छ धुऊन 10-15 मिनिटे मऊ होईपर्यंत भिजवून ठेवा.
भिजवलेले पोहे, नाचणी पीठ आणि दही एकत्र करून मिक्सरमध्ये थोडं वाटून घ्या. बॅटर जाडसर ठेवा.
बॅटरमध्ये किसलेली भाजी, हिरवी मिरची, आलं, मीठ आणि थोडं पाणी घालून नीट मिक्स करा.
बॅटर 2-3 तास झाकून ठेवल्यास हांडवो अधिक मऊ आणि चविष्ट होतो.
पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, तीळ, कढीपत्ता टाकून तडका द्या. त्यात बॅटर ओतून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.
दोन्ही बाजूंनी शिजल्यावर तुकडे करून हिरवी चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.