Shreya Maskar
पोह्याचे पापड बनवण्यासाठी जाड पोहे, हिंग, पापडखार, जिरे पूड , मीठ , लाल तिखट आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
पोह्याचे पापड बनवण्यासाठी पोहे हलके गरम करून मिक्समध्ये वाटून बारीक पीठ तयार करून घ्या. पीठात मीठ मिक्स करा.
आता एका मोठ्या भांड्यात हे पीठ टाकून त्यात पाणी मिक्स करा. पीठाचे आणि पाण्याचे प्रमाण समान ठेवा. जेणेकरून पीठ जास्त पातळ आणि घट्ट होणार नाही.
आता या पीठात हिंग, पापडखार, जिरे पूड आणि लाल तिखट मिक्स करा. सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. तयार पीठ १० मिनिटे झाकून ठेवा.
तयार पीठाचे छोटे छोटे गोळे करून गोल पापड लाटा. एका प्लास्टिक पेपरवर पोह्याचे पीठ भुरभुरवून त्यावर लाटलेले पापड ठेवा.
पापड लाटून झाल्यावर कडक उन्हात वाळवून घ्या. तसेच घरी पंख्याखाली सुकवा. वर्षभर टिकणारे कुरकुरीत पोह्याचे पापड तयार झाले.
तुम्हाला खायचे असेल तेव्हा पापड गरमागरम तेलात तळून घ्या. कुरकुरीत पापडांचा जेवणासोबत आस्वाद घ्या.