Kairi Chutney Recipe : आंबट-गोड कैरी अन् वाटीभर खोबरं; १० मिनिटांत बनवा चटणी, एक घास खातच येईल कोकणची आठवण

Shreya Maskar

कैरीचा सीझन

कैरीचा सीझन आलाय. त्यामुळे अनेकांच्या घरात कैरीपासून पदार्थ बनवले जातात. तुम्ही सुद्धा कैरीपासून कोकणात बनवला जाणारा हा खास पदार्थ घरी नक्की ट्राय करा. ज्याचे नाव आहे, कैरी-खोबऱ्याची चटणी

raw mango | yandex

कैरी-खोबऱ्याची चटणी

कैरी-खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी कैरी, ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ, पाणी इत्यादी साहित्य लागते.

Kairi Chutney | yandex

कैरी

कैरी-खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरे, कैरीचे तुकडे, हिरव्या मिरच्या वाटून घ्या.

Raw Mango | yandex

लसूण

यात आलं, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून पेस्ट बनवा. पेस्ट जास्त घट्ट किंवा पातळ असणार नाही, याची काळजी घ्या.

Garlic | yandex

चटणी-भाकरी

पराठा, भाकरी, चपातीसोबत कैरी-खोबऱ्याची चटणी खूपच चवदार लागते. कोकणात ही रेसिपी उन्हाळ्यात आवर्जून बनवली जाते.

Kairi Chutney | yandex

कैरीचे फायदे

कैरीमुळे अॅसिडीटीचा त्रास कमी होतो. अपचन होत नाही. शरीराला थंडावा देते, पचन सुधारते. यात भरपूर फायबर असते.

Kairi Chutney | yandex

खोबऱ्याचे फायदे

खोबऱ्यातील पोषक घटकांमुळे पचनशक्ती सुधारते, त्वचेचा पोत सुधारतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदयाचे आरोग्य टिकून राहते.

Coconut | yandex

कैरीचे पदार्थ

कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. उदा. कैरीचे लोणचे, मेथांबा, चटणी, कैरीचे पन्हे, कैरीची डाळ

Kairi Chutney | yandex

NEXT : रणरणत्या उन्हात कैरीचे पन्हे पिण्यासारखे दुसरी सुख नाही, गावाकडे 'अशी' बनवतात रेसिपी

Kairi Panha Recipe | saam tv
येथे क्लिल करा...