Shreya Maskar
नाश्त्याला रोजचे कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर, पोहे कचोरी हा खास पदार्थ बनवा.
पोहे कचोरी बनवण्यासाठी पोहे, उकडलेले बटाटे, ब्रेडचे तुकडे, चिली फ्लेक्स, लिंबू, भाजलेले शेंगदाणे, कांदा, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, दही, तेल , मीठ इत्यादी साहित्य लागते.
पोहे कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात उकडलेले बटाटे मॅश करा.
या बटाट्याच्या मिश्रणात ब्रेड स्लाइसचे लहान तुकडे करून घाला.
या मिश्रणात चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घाला.
कचोरीचे सारण बनवण्यासाठी शेंगदाणे, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, आले, दही, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
बटाट्याच्या पिठाचे गोळे करून कचोरीची वाटी तयार करून त्यात पोह्याचे सारण भरून छान मिक्स करून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कचोरी गोल्डन फ्राय करून घ्या.
गरमागरम पोहे कचोरीचा पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.