Shreya Maskar
रात्री चपात्या उरल्या असतील तर सकाळी सॉफ्ट केक तयार करा.
उरलेल्या चपात्यांपासून केक बनवण्यासाठी उरलेल्या चपात्या, तवा, दूध, बिस्कीट, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर, तूप इत्यादी साहित्य लागते.
उरलेल्या चपात्यांपासून केक बनवण्यासाठी सर्वप्रथम चपात्या पॅनवर भाजून घ्या. मात्र त्या जळणार नाहीत याची मात्र काळजी घ्या.
आता कडक चपात्या मिक्सरला वाटून त्याची पावडर तयार करून घ्या.
तुमच्या आवडीचे बिस्किटे देखील मिक्सरला बारीक करून घ्या.
एका बाऊलमध्ये चपात्या आणि बिस्किटांचे पीठ एकत्र करून त्यात दूध टाकून छान मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणात थोडीशी साखर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घाला.
या केकची चव वाढवण्यासाठी तुमच्या आवडीनुसार त्यात टूटी फ्रूटी किंवा नट्स घाला.
केक ट्रेला बटर लावून त्यात हे मिश्रण टाका.
कुकरमध्ये केक बनवण्यासाठी 10 मिनिटे कुकर गरम करून त्यामध्ये केकचा बेकिंग ट्रे ठेवा आणि सुमारे 25 ते 30 मिनिटं केक बेक करा. स्वीट, सॉफ्ट चपात्यांचा केक तयार झाला.