गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

हेल्दी नाश्ता

सकाळी उठल्यानंतर कडकडून भूक लागलेली असते. सकाळी नाश्त्याला गरमा गरम चहासोबत काय बनवायचे? हा प्रश्न सर्वंच महिलांना असतो.

Breakfast

नवीन रेसिपी

पोहे, उपमा, शिरा हे नाश्त्याचे प्रकार आपण नेहमीच खातो यासाठी आज आम्ही तुम्हाला पोह्याची नवीन रेसिपी सांगणार आहोत.

Poha Kachori Recipe

पोहा कचोरी

पोह्यापासून तुम्ही कुरकुरीत कचोरी ट्राय करू शकता. कचोरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Poha Kachori Recipe

साहित्य

पोहा कचोरी बनवण्यासाठी सर्वातआधी बटाटे, कॉर्न, धने, बडीशेप, जीरे, गरम मसाला, बेसन, तेल, हळद, लिंबाचा रस, पिठीसाखर, मीठ, ब्रेड, जिरे पावडर हे साहित्य घ्या.

Poha | yandex

पोहे स्वच्छ धुवून घ्या

रेसिपी बनवण्यासाठी सर्वातआधी पोहे स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घाला.

Poha | yandex

मिश्रण तयार करा

नंतर मिक्सरमध्ये ब्रेड बारीक करून घ्या. एका भांड्यात ब्रेड आणि पोहे मिक्स करून त्यात जिरा पावडर आणि मीठ मिक्स करा.

Bread

कचोरी स्टफिंग तयार करा

कचोरी स्टफिंगसाठी उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या नंतर त्यात स्वीट कॉर्न वाफवून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

Boiled potato

मसाले मिक्स करा

त्यानंतर धन, जिरे आणि बडीशेप मिक्सरमध्ये बारीक करा. गॅसवर कढईमध्ये बेसन भाजल्यानंतर एका भांड्यामध्ये स्मॅश केलेला बटाट, कॉर्न पेस्ट आणि धने, जिरे मसाला मिक्स करा. मिश्रणात हळद आणि गरम मसाला मिक्स करा.

Spicy spices

कचोरी तयार करा

सर्व साहित्य मिक्स करून पोह्याची छोटी पुरी बनवून त्यात सारण भरा. कचोरीसारखा आकार द्या. अप्पेपात्रात कचोरी शेकून घ्या. अशाप्रकारे सर्व पोहा कचोरी घरच्या घरी सर्व्हसाठी तयार होतील.

Poha Kachori Recipe

next: गावरान स्टाईलमध्ये बनवा हिरव्या माठाची भाजी, रेसिपी आहे एकदम सोपी

Hirvya Mathachi Bhaji Recipe
येथे क्लिक करा...