Poha Chivda Recipe : दिवाळीत पोह्यांचा चिवडा बनवताना फक्त 'ही' ट्रिक वापरा, मिळेल बाजारासारखी कुरकुरीत चव

Shreya Maskar

पोह्यांचा चिवडा

पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहे, शेंगदाणे, भाजलेली डाळ, काजू, सुके खोबरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, मोहरी, हळद, लाल तिखट , मीठ, पिठीसाखर, मनुका आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Poha Chivda | pinterest

पातळ चिवडा

पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम पातळ पोहे निवडून घ्या. पॅनमध्ये गरम करून मंद आचेवर पोहे हलके कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. पोहे भाजताना सतत हलवत राहा. त्यानंतर ते एका मोठ्या परातीत काढून ठेवा.

Poha | pinterest

शेंगदाणे

पॅनमध्ये तेल गरम करून शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्यानंतर काजू, सुके खोबरे आणि भाजलेली डाळ परतून घ्या. हे सर्व साहित्य एका भांड्यात काढून ठेवा.

Peanuts | pinterest

कढीपत्ता

आता पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने घालून कुरकुरीत होईपर्यंत परता. त्यानंतर हळद आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा.

curry leaves | pinterest

खोबरे

आता फोडणीमध्ये भाजलेले पोहे, शेंगदाणे, काजू, खोबरे आणि भाजलेली डाळ घाला. सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करा, जेणेकरून पोहे तुटणार नाहीत.

Coconuts | pinterest

मीठ

आता चवीनुसार मीठ आणि थोडी पिठीसाखर घाला. आवडत असल्यास मनुका घालून सर्व मिश्रण पुन्हा हलक्या हाताने मिसळा. मंद आचेवर आणखी २ ते ३ मिनिटे गरम करून गॅस बंद करा.

salt | pinterest

चिवडा स्टोर करा.

तयार चिवडा एका मोठ्या ताटात पसरवून पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा. यामुळे चिवडा कुरकुरीत राहण्यास मदत होते.

Store chivda. | pinterest

टीप

चिवडा बनवण्यासाठी शक्यतो पातळ पोहे वापरा. पोहे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. त्यामुळे त्यातील ओलावा कमी होऊन ते कुरकुरीत होतात.

Note | pinterest

NEXT : दिवाळीचा फराळ होईल खास! बनवा कोकण स्पेशल खुसखुशीत गोड बोरं, खूपच सोपी आहे रेसिपी

Sweet Bor Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...