Shreya Maskar
प्लम पुडिंग बनवण्यासाठी रिफाइंड पीठ, बेकिंग पावडर, ड्रायफ्रूट्स, काळा मनुका, तुटी फ्रुटी, व्हाईट ब्रेड क्रम्ब्स इत्यादी साहित्य लागते.
पुडिंगचा मसाला बनवण्यासाठी लवंग, वेलची, बटर, ब्राऊन शुगर, अंडी, लिंबाचा रस, सफरचंद आणि फुल क्रीम दूध इत्यादी साहित्य लागते.
प्लम पुडिंग बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेकिंग पावडर, ब्रेड क्रम्ब्स, मसाले, ड्रायफ्रुट्स, सफरचंद, बदाम आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.
दुसऱ्या बाऊलमध्ये बटर, मीठ आणि ब्राऊन शुगर घालून विरघळेपर्यंत मिक्स करा.
या मिश्रणात अंडी, दूध, काळ्या मनुका, तुटी फ्रुटी घालून पेस्ट तयार करा.
बेकिंग ट्रेला ग्रीस करा आणि मिश्रण त्यात टाका.
ओव्हनमध्ये प्लम पुडिंग दोन तास बेक करा.
पुडिंग बेक झाल्यावर फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा. शेवटीवरून शुगर आयसिंग करा.