Shreya Maskar
पनीर लबाबदार बनवण्यासाठी टोमॅटो, काजू, लसूण, वेलची, लवंगा, आले, मीठ, फ्रेश क्रीम, पनीर, कांदा, खडे मसाले, कसुरी मेथी, हिरवी मिरची, कोथिंबीर पावडर, बटर, पाणी इत्यादी साहित्य लागते.
पनीर लबाबदार बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे तुकडे कोमट पाण्यात गरम करून घ्या.
कोमट पाण्यात टॉमेटो, लसूण आणि आल्याचा तुकडा, लवंग, वेलची, काजू आणि थोडे मीठ घालून शिजवा.
मिश्रण थंड झाल्यावर त्याची प्युरी करून घ्या.
आता पॅनमध्ये बटर टाकून सर्व खडे मसाले, हिरवी मिरची आणि कसुरी मेथी घालून तळून घ्या.
या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, हळद, लाल मिरची, धनेपूड आणि इतर मसाले घालून मिक्स करून टोमॅटोची प्युरी टाका.
प्युरीला उकळी आल्यावर पनीरचे तुकडे आणि किसलेले पनीर घालून मिक्स करा.
शेवटी वरून मलई आणि कोथिंबीर घालायला विसरू नका.