Sakshi Sunil Jadhav
लेह लडाख फिरण्याचे स्वप्न आता होईल पूर्ण. येत्या सुट्टीमध्ये हा प्लान मित्रांसोबत नक्की शेअर करा.
लेह-लडाखचा निसर्ग म्हणजे बर्फाच्या पर्वतरांगा, निळसर रंगाचे तलाव आणि विशाल दऱ्यांचे अद्भुत मिश्रण. शांतता आणि सौंदर्याचा अनोखा अनुभव इथे प्रत्येक ठिकाणी जाणवतो.
सप्टेंबर हा लेह-लडाख फिरण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. हवामान सुखद असते. पर्यटनाची गर्दी थोडी कमी झालेली असते आणि तिथली दृश्यं स्वच्छ दिसतात.
७-१० दिवसांची ट्रिप साधारण २५,००० ते ३५,००० रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकते.
तुम्ही फ्लाइटने दिल्ली ते लेह २ तासात गाठू शकता. त्याचा खर्च ५ ते ८ हजारांपर्यंतचा असेल. तुम्ही यामध्ये रोड ट्रीपचा प्लान सुद्धा करु शकता. त्यासाठी मनाली–लेह किंवा श्रीनगर–लेह मार्ग निवडावा लागेल.
बजेट हॉटेल्स, होमस्टे किंवा हॉस्टेल्स उपलब्ध आहेत. ८०० ते १५०० रुपयांमध्ये चांगली रूम मिळू शकते.
तुम्ही येथे पॅंगॉंग लेक, नुब्रा व्हॅली, खारदुंग ला पास, मॅग्नेटिक हिल, शांती स्तूप अशी अनेक ठिकाणे पाहता येणार आहेत.
तुम्ही येथे जिप किंवा बाईक रेंटने वापरु शकता. याचा खर्च दिवसाला २ हजारांपर्यंत होईल.
थुक्पा, मोमोज, बटर टी हे स्थानिक पदार्थ नक्की ट्राय करा. तेथे तुम्हाला दर २०० ते ३०० रुपये द्यावा लागेल. मात्र जेवण उत्तम असेल.