Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला जर कोकणातल्या खऱ्या सौंदर्याचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही पुढील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणांनी एकदा भेट देऊन पाहाच.
रत्नागिरीपासून जवळ असलेला आरे-वारे बीच निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. स्वच्छ वाळू, स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरण तुम्हाला इथे पाहायला मिळेल.
गणपती मंदिरामुळे गणपतीपुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. समुद्रकिनारा आणि मंदिर एकत्र असल्याने भाविकांची इथे खूप गर्दी असते.
कमी ओळखला जाणारा पण अत्यंत सुंदर असा देवघळी बीच शांतता आणि निसर्ग अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूर्णगड किल्ला इतिहासप्रेमींसाठी खास आकर्षण आहे. या किल्ल्यावरून दिसणारा समुद्रकिनारा मन मोहून टाकतो.
पारंपरिक कोकणी संस्कृती अनुभवायची असेल तर वरचडे गावाला भेट द्यायलाच हवी. गावातील शांत जीवनशैली पर्यटकांना वेगळा अनुभव देते.
स्थानिक भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेले जयविनायक मंदिर शांत व प्रसन्न वातावरणासाठी ओळखले जाते.
रत्नागिरीतलं महत्त्वाचं मासेमारी बंदर असलेलं मिऱ्या बंदर सकाळच्या वेळी पाहण्यासारखं असतं. इथे मच्छिमारांची धावपळ पाहायला मिळते.
मिऱ्या बंदर परिसरात असलेलं बस्टर जहाज पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. समुद्रात अडकलेलं हे जहाज फोटोसाठी प्रसिद्ध आहे.