Travel: उन्हाळ्याच्या सुट्टीत ट्रिप प्लॅन करताय? 'या' ५ आवश्यक गोष्टी तुमच्या बॅगेत असायलाच हव्यात

Dhanshri Shintre

बाहेर फिरण्याचा बेत

मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक कुटुंबं सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरण्याचा बेत आखताना दिसतात.

थंड हवेच्या ठिकाणी

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच अनेकजण फिरायला जाण्याची योजना आखतात आणि उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणं पसंत करतात.

मानसिक शांतता

कडक उन्हापासून विश्रांती आणि मानसिक शांतता प्रत्येकाला हवी असते, पण उन्हाळ्यात प्रवास करणे अनेकदा खूपच आव्हानात्मक ठरते.

सनस्क्रीन

उन्हाळ्यात सहलीसाठी प्लॅन करत असाल तर बॅगेत सनस्क्रीन ठेवणे आवश्यक आहे, जे तुम्हाला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित ठेवेल.

सनग्लासेस

सूर्यप्रकाश थेट डोळ्यांवर पडू नये म्हणून प्रवासात सनग्लासेस किंवा कॅप वापरा, विशेषतः चालताना या वस्तू अत्यंत उपयुक्त ठरतात.

हलके कपडे

उन्हाळ्यात जड कपडे परिधान केल्याने त्रास होतो, त्यामुळे प्रवासात बॅगेत हलके आणि आरामदायक कपडे ठेवणे फायदेशीर ठरते.

पॉवर बँक आणि चार्जर

आजकाल मोबाईलशिवाय जीवन कठीण आहे, त्यामुळे सहलीसाठी निघताना बॅगेत पॉवर बँक आणि चार्जर घेऊन जाणे अत्यावश्यक आहे.

NEXT: शांतता आणि सौंदर्य शोधताय? मग उत्तराखंडातील 'हे' हिल स्टेशन्स तुमच्यासाठी परफेक्ट आहे

येथे क्लिक करा