Dhanshri Shintre
कूर्ग हिल स्टेशन सुगंधी मसाले आणि ताज्या कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध असून, निसर्ग सौंदर्याने भरलेले आहे.
पर्यटक कूर्गमध्ये धबधबे, किल्ले, प्राचीन मंदिरे आणि तिबेटी वस्त्यांची सैर करू शकतात, जेथे निसर्गाचा अनुभव घेत येतो.
कूर्ग किल्ला, जो राजा लिंगराजेंद्र कुवेरच्या काळात बांधला गेला होता, तो कूर्गचा ऐतिहासिक वारसा दाखवतो.
कूर्ग कावेरी नदीचे उगमस्थान आहे, आणि त्याच्या लुभावणाऱ्या निसर्ग सौंदर्यामुळे ते पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय बनले आहे.
कूर्गमध्ये तुम्ही ओंकारेश्वर मंदिराची भेट घेऊन ऐतिहासिक व धार्मिक अनुभव घेऊ शकता.
भगवान शिवांना समर्पित हे मंदिर १८२० मध्ये बांधलेले असून, कूर्गमधील सर्वात जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे.
कूर्गमध्ये पर्यटक पाडी इग्गुथप्पा मंदिराला भेट देऊ शकतात, जे ओंकारेश्वर मंदिराच्या दहा वर्षे आधी बांधले गेले होते.
कूर्गमध्ये कुर्गी लोकांची एक विशिष्ट संस्कृती आहे. त्यांचा पोशाख, भाषा आणि पारंपरिक रीतिरिवाज इतर भागांपेक्षा वेगळे आहेत.