Maharashtra Tourism: पावसाळ्यात फिरायला जायचा प्लान करताय? या ४ ठिकाणी मिळेल डोंगर, दरी आणि धबधब्यांचा अनुभव

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

पावसाळ्यात महाराष्ट्रातील निसर्ग अत्यंत हिरवागार आणि ताजातवाना दिसतो. सह्याद्रीच्या रांगा, धबधबे आणि धुक्याने झाकलेले डोंगर हे मुख्य आकर्षण असते. या काळात फोटोशूट आणि निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

प्रवास करताना घ्यायची काळजी

पावसाळ्यात प्रवास करताना रस्ते घसरडे आणि धुक्याचे असू शकतात. त्यामुळे योग्य चपला आणि रेनकोट बरोबर ठेवणं गरजेचं आहे. हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवासाचं नियोजन केल्यास सुरक्षितता वाढते.

पर्यटन

महाराष्ट्रात पावसाळ्यात डोंगर, धबधबे आणि समुद्रकिनारे हे प्रमुख आकर्षण असतात. ट्रेकिंगसाठी किल्ले आणि घाटरस्ते प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणी निसर्ग आणि साहस दोन्हीचा अनुभव मिळतो. या दिवसात तुम्ही कुठे फिरायला जाऊ शकता ते पाहूयात.

भंडारदरा

भंडारदरा हे पावसाळ्यातील अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी आर्थर लेक आणि रंधा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात इथलं धुकं आणि हिरवाई संपूर्ण परिसराला स्वप्नवत रूप देतात.

जव्हार

जव्हार हे एक शांत आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. याठिकाणी असलेले धबधबे आणि किल्ला इतिहासप्रेमींसाठी खास आकर्षण आहेत. पावसाळ्यात याठिकाणी हिरवळ आणि धुकं मनाला प्रसन्न करतात.

चिखलदरा

चिखलदरा हे महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीव अनुभवता येतात. पावसाळ्यात इथलं हवामान थंड आणि आल्हाददायक असतं.

वेलास

वेलास हे कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध गाव आहे. पावसाळ्याच्या आधी याठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्लं समुद्रात सोडली जातात. शांत समुद्रकिनारा आणि निसर्ग अनुभवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा