Nashik tourism: पावसाळ्यात वनडे ट्रिप प्लान करताय? नाशिकजवळची ही 4 ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

पावसाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला एक खास जागा सांगणार आहोत. निसर्गाचा हिरवागार नजारा अनुभवण्यासाठी हा उत्तम काळ असतो. या दिवसांत थंड हवा, दाट धुके आणि हिरवाईमुळे ट्रिप अधिक सुंदर आणि आनंददायी बनते.

nashik tourism | saam tv

नाशिक

नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरात अनेक सुंदर आणि धार्मिक तसंच निसर्गरम्य ठिकाणं अगदी जवळच्या अंतरावर उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात एक चांगली वनडे किंवा दोन दिवसांची ट्रिप सहजपणे करता येते.

rainy season trip | saam tv

पावसाळ्यात नाशिकचं सौंदर्य

पावसाळ्यात नाशिक शहर आणि परिसर अधिकच मनमोहक दिसतो. डोंगररांगा हिरव्यागार होतात, धबधबे आणि धुक्याने संपूर्ण परिसर छान खुलून दिसतो. अशा वातावरणात फिरण्याचा अनुभव हा खूप शांत आणि आनंददायी असतो.

india travel guide | saam tv

त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर हे नाशिकजवळील अत्यंत प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. याठिकाणी असलेलं ज्योतिर्लिंग हे भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थान आहे. पावसाळ्यात याठिकाणी डोंगर आणि हिरवाईमुळे परिसर अधिकच सुंदर दिसतो.

hill stations near nashik | saam tv

सप्तशृंगी गड

सप्तशृंगी गड हे देवी सप्तशृंगीचे पवित्र शक्तिपीठ आहे. पावसाळ्यात या गडावर जाणारा प्रवास खूपच रोमांचक आणि निसर्गरम्य असतो. दाट धुके, हिरवीगार दऱ्या आणि थंड वारा यामुळे हा अनुभव अविस्मरणीय बनतो.

saptashrungi gad | saam tv

धोपड फोर्ट

धोपड फोर्ट हे ट्रेकिंगसाठी एक शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे. पावसाळ्यात याठिकाणच्या वाटा हिरवाईने भरून जातात आणि वरून दिसणारा परिसर अतिशय सुंदर दिसतो.

anjeneri fort trek | saam tv

अंजनेरी फोर्ट

अंजनेरी फोर्ट हे हनुमान जन्मभूमी म्हणून ओळखलं जातं आणि ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात याठिकाणी धुक्यात हरवलेलं डोंगर, हिरवागार निसर्ग आणि थंड हवामानामुळे प्रवास अधिकच छान होतो.

dhodap fort trekking | saam tv

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

येथे क्लिक करा